
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील पेठकिल्ला व नाचणे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक मेहबुब तांडेल (वय ३८, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) व रत्नदिप हरिहर शहा (वय २७, रा. नाचणे रोड, रत्नागिरी ) अशी संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास नाचणे व पेठकिल्ला येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तौफिक तांडेल हा मुरुगवाडा येथे तर रत्नदिप शहा हा नाचणे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार जितेंद्र पालांडे यांनी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.