
उक्षी जवळ रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह
संगमेश्वर : संगमेश्वर ते उक्षी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात तरुणाचा प्रवास करत असताना पडून मृत्यू झाला होता. या तरुणाची ओळख पटवण्याचे काम संगमेश्वर पोलिस करत होते. त्या तरुणाची ओळख पटली असून, रुपूस मारकूस खडिया (वय २४, रा. झारखंड) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ पोंडू मारकूस खडिया यांने खबर दिली. संगमेश्वर ते उक्षीच्या दरम्यान कोणत्यातरी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडला होता.