
कशेडी घाट अपघातातील मृत कंटेनर चालकावर गुन्हा
खेड:- मुंबई- गोवा महामार्गा वरील कशेडी घाटात सुमारे १५० फूट दरीत टँकर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या टँकर चालकाचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात २५ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
जिवनलाल रामकृपाल बारी वय – ३४ वर्षे रा. देवरी पोस्ट अमा ता. नागोव जि. सतना राज्य मध्यप्रदेश सध्या रा. महाड एम. आय. डी. सी जि. रायगड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या मृत टँकर चालकाचे नाव आहे या प्रकरणी
जितेंद्र विठ्ठल घाणेकर , पोलीस उपनिरिक्षक यांनी फिर्याद दाखल केली केमिकल वाहतुक करणारा टॅकर क्र- एम.एच- ०४ सी. जी ७९६२ वरिल मयत आरोपी चालक यांने आपल्या ताब्यातील टॅकर महाड ते लोटे ता. खेड असा कशेडी घाटातील रोड तिव्र उताराने जात असताना रोडच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्याला धडक देवुन तेथुन खोल दरीत सुमारे १५० फुट खाली टँकर कोसळून स्वताचे गंभीर स्वरुपाचे दुखापतीस मृत्यूस कारणीभुत ठरला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.