
आयएमए रत्नागिरीच्या वतीने ‘एन्टीबायोटिक्सचा वापर’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन
रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने ‘एन्टीबायोटिक्सचा वापर’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन कारण्यात आले होते.
डॉ. वाय. के. आमडेकर यांनी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते या क्षेत्रातील नामवंत तज्ञ असून त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. आयएमए रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव डॉ. प्रज्ञा पोतदार यांच्या सहकार्याने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सातारा येथून डॉ. एस. पोतदार, रत्नागिरीतील डॉ. शरद प्रभुदेसाई. डॉ. गोंधळेकर, डॉ. निलेश शिंदे, डॉ. भोळे यांच्यासह रत्नागिरीतील अनेक मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते.