
राजापूर पोलिस निरिक्षक पदी फुलचंद मेंगडे
राजापूर: गेले काही दिवस राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पद रिक्त असल्याने राजापूरच्या सुरक्षेला वाली कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन विचारला जात असतानाच गुरुवारी राजापूर पोलिस स्थानकाचा कार्यभार पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यानी स्विकारला आहे .
शासनाने जानेवारी महिण्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस निरिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या . राजापूरचे पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांची १९ जानेवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाल्याने राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पद रिक्त झाले होते . रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्यात त्या त्या पदावरील अधिकारी हजर झाले होते मात्र राजापूर पोलिस निरिक्षक पद गेले दोन आठवडे रिक्त होते . पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांची बदली झाल्यानंतर राजापूर पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सागरी पोलिस ठाणे नाटे चे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदारी यांच्याकडे देण्यात आला होता .
त्याच दरम्यान राजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही संवेदनशील घटनाही घडल्या होत्या तर राजापूर शहरात घरफोडीही झाली होती . या दोन्ही घटना सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदारी यानी उत्तम प्रकारे हाताळल्या होत्या . मात्र राजापूरचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे असल्यामुळे राजापूर पोलिस ठाण्याला कायमस्वरुपी पोलिस निरिक्षक कधी मिळाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिले होते . जिल्ह्यातील बाकी सर्व पोलिस ठाण्यात रिक्त झालेली पदे तातडीने भरण्यात आली होती मात्र राजापूर पोलिस निरिक्षक हे पद गेले दोन आठवडे रिक्त होते . अखेर गुरुवार दिनांक १ फेब्रूवारी २०२४ रोजी यापुर्वी वैभववाडी येथे कार्यरत असणार्या फुलचंद मेंगडे यांच्याकडे राजापूर पोलिस निरिक्षक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे .