
दोन दुचाकीत अपघात ; दुचाकींचे नुकसान, दोघे जखमी
रत्नागिरी ः तालुक्यातील टेंभे-धनगरवाडा रस्त्यावर अपघात करुन दुखापतीस व दोन वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कृष्णा मयेकर (रा. काळबादेवी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) रात्री सव्वाआठच्या सुमारास टेंभे-धनगरवाडा येथील खोबरा आंबा रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिपक महादेव जोशी (रा. चिंद्रवली खेडकुळीवाडी, रत्नागिरी) हे ड्युटी संपवून दुचाकी (क्र. एमएच-०८ एझेड ३५७७) घेऊन रत्नागिरी ते खेडकुळी असे जात असताना टेभे धनगरवाडा येथील खोबरा आंबे येथे देवधे रस्त्याने येणाऱे दुचाकी (क्र. एमएच-०८ एटी ७०२७) वरील चालक संशयित गणेश मयेकर यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवून दिपक जोशी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्याचे नुकसान झाले तसेच दोघेही स्वार जखमी झाले. या प्रकरणी जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित गणेश मयेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.