
वरवडे येथे हातभट्टीची २० लिटर दारु जप्त
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर केली. या कारवाईत १ हजार ११० रुपयांची २० लिटर दारु जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. अमित नारायण पाटील (वय ४१, रा. वरवडे, भंडारवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगवारी (ता. ३०) दुपारी पावणेपाचच्या सुमारास भंडारवाडा-वरवडे येथील गडग्याच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अमित हा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्री करण्याच्या स्थितीत सापडला. त्याच्याकडून १ हजार ११० रुपयांची २० लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.