
बशीर मूर्तुझा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती
रत्नागिरी –बशीर मुर्तुझा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार
यांचे
अत्यंत जवळचे मानले जातात. तसेच माजी प्रदेश प्रांतीक सदस्य यांनी सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर
बाशिर मूर्तुझा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नेमणूक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा
शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले., हे पत्रक प्रदेश अध्यक्ष जयंत पाटी
ल यांच्या मान्यतेने देण्यात आले. यावेळी मा
जी.गृहमंत्री अनील देशमुख, युवक प्रदेश अध्यक्ष
मेहबूब शेख पक्ष संघटक सौ.आदीती ताई नलावडे , रत्नागिरी जिल्हा निरिक्षक बबनराव कनावजे रत्नागिरी
, जिल्हाध्यक्ष सुरेश शेठ बने , रत्नागिरी युवक
जिल्हाध्यक्ष नौसीन काझी , विद्यार्थी
जिल्हाध्यक्ष संकेत कदम आदी मान्यवर उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत ,धडाडीचे काम करणारे तसेच अभ्यासु-कर्तुत्ववान असे नेतृत्व असलेले बशिर मुर्तुझा यांनी नियुक्ती झाल्यावर मला आजवर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले व करत आहेत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी अजून जोमाने काम करणार असे बशीर
मुर्तुझा यांनी सांगितले.