
महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे ४ फेब्रुवारीला अनावरण
रत्नागिरी,- महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता जिजामाता उद्यान, थिबा पॉईंट येथे होणार आहे.
रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण असलेल्या या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.