
राजापूर तहसील कार्यालयासह पोलीस ठाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
राजापूर :गेले काही दिवस तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. बुधवारी मध्यरात्री राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यामधून एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. झालेल्या या झटापटीत रक्ताचे डाग त्या व्हरांड्यात पाहायला मिळाले. दरम्यान त्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यान्मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यामधून बुधवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी काही पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. त्यांनी देखील तो प्रकार पाहिला चार पाच कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्या अचानक पोलीस ठाण्याच्या मागील बाजुने आत घुसला सुरुवातीला काही सेकंद तो बिथरला आजुबाजुला कुणी नसल्याचा अंदाज घेऊन तो पुढे सरकला. दरम्यान जीवाच्या आकांताने धावणारी ती कुत्री थेट पोलीस ठाण्याच्या इमारतीत फिरत होती. इकडुन तिकडे पळत होती मात्र पुढे पळण्यासाठी मार्ग नसल्याने ती पुन्हा माघारी फिरली दरम्यान चपळाईने आत घुसलेल्या बिबट्याने एका बाजुला घुसुन एका कुत्र्याला पकडले आणि त्या उचलुन घेऊन तो तुरुंगाच्या दिशेने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजुने पसार झाला हा प्रकार राजापूर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झाल्या घटनेने पोलीस कर्मचाऱ्यात काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.
राजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी ड्युटीवर कार्यरत असतात. काही कर्मचारी रात्रीची डुटी उशीरा संपल्यामुळे तेथेच मुक्कामी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अहोरात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीसांच्याच सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.बिबट्या
एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. झालेल्या या झटापटीत रक्ताचे डाग त्या व्हरांड्यात पाहायला मिळाले. दरम्यान त्या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यान्मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.