
संदीप कृष्णा नाचणकर यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
रत्नागिरी– मिरजोळे ग्रामपंचायत माजी सरपंच बावा उर्फ संदीप नाचणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी त्यांची भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं नियुक्तीपत्र भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिलं आहे.
सन २०२३ ते २०२६ या कालावधीकरिता अथवा पुढील निवड होईपर्यंत नियुक्ती करण्यात येत आहे. आपण पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणांच्या आधीन राहून पक्ष वाढीसाठी यथाशक्ती प्रयत्न करावेत. असं या पत्रात म्हटलं आहे. पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, ती मी अतिशय विश्वासपूर्वक पार पाडीन अशी भावना संदीप नाचणकर व्यक्त यांनी केली आहे.