
नारशींगे-राई येथून जनरेटरची चोरी
रत्नागिरी ः तालुक्यातील नारशींगे-राई येथे ९५ हजाराचा जनरेटर अज्ञात चोरट्याने पळविला. ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) पहाटे तीनच्या सुमारास नारशींगे-राई येथील जमीन गट न ४५७ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संदेश चंद्रकांत जोशी यांनी त्यांचा मालकीचा ९५ हजाराचा जनरेटर चोरट्याने चोरला. या प्रकरणी जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.