
कोळंबे येथे नेपाळ्याची आत्महत्या
रत्नागिरी ः कोळंबे येथील हापूस आंहा बागेतील झाडाला गळफास घेऊन नेपाळी प्रौढाने आत्महत्या केली. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्णबहाद्दूर बुडा क्षेत्री (रा. बस्थानी, कैलाली-नेपाळ, सध्या बागवाडी कोळंबे-रत्नागिरी) असे मृत नेपाळ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी सहाच्या सुमारास भगवान भितळे यांच्या कोळंबे येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी क्षेत्री याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन कोळबे येथे हापूस आंब्याच्या बागेत गळफास घेऊन आत्महत्या केली.