
विधानसभा मतदार संघाच्या अंतिम मतदार याद्या 22 ऐवजी 23 जानेवारी रोजी होणार प्रसिध्द: राहूल गायकवाड
रत्नागिरी : सोमवार 22 जानेवारी रोजी श्री. रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या अंतिम मतदार याद्या 22 जानेवारी ऐवजी 23 जानेवारी, 2024 (मंगळवार) रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक 22 जानेवारी, 2024 (सोमवार) असा होता. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या दि. 19 जानेवारी, 2024 च्या अधिसुचनेनुसार परक्राम्य संलेख अधिनियम (1881 चा 26)च्या कलम 25 अन्वये सोमवार 22 जानेवारी रोजी श्री. रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.
त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 19 जानेवारी 2024 च्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारी, 2024 (मंगळवार) रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
तरी, सदर बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी मंगळवार, दि. 23 जानेवारी, 2024 रोजी करण्यात
येईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.