
चिन्मय कॅरम क्लब -अंतर्गतलकी डबल कॅरम स्पर्धा संपन्न.
रत्नागिरी :- नाचणे रोड , पाॅवरहाऊस येथील “चिन्मय कॅरम क्लब” च्या क्लब मर्यादित लकी डबल कॅरम स्पर्धा दिनांक १४- जानेवारी , रविवार रोजी मोठ्या दिमाखात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरीतील युवा उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते , श्री. सौरभ शेठ मलुष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या प्रसंगी चिन्मय कॅरम क्लब चे अध्यक्ष श्री. अभिजित उर्फ दादा शेठ नागवेकर, फैयाज खतीब, गणेश शेंडे, व सर्व क्लब चे सभासद उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव प्रसिद्ध कॅरम क्लब “चिन्मय कॅरम क्लब” पाॅवर हाऊस, नाचणे रोड येथील हे क्लब गेली १७ वर्षे कॅरम खेळाचा प्रचार व प्रसार सातत्याने करत आहे. स्पर्धेत सुमारे ८० स्पर्धेक सहभागी झाले होते.
चिन्मय लकी डबल कॅरम स्पर्धा निकाल
विजेता जोडी :- ओम पारकर
अक्षय तांबे
उपविजयी जोडी:- निलेश निवळकर
प्रथमेश शिवलकर
कॅरम स्पर्धैच्या बक्षिस समारंभ करिता प्रमुख उपस्थिति म्हणून श्री.लहू घाणेकर व रवी स्ट्रायकरचे मालक श्री.रवीशेठ घोसाळर व क्लबचे पदाधिकारी याच्यां उपस्थित पार पडला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिन्मय कॅरम क्लब चे सदस्य मंगेश कवितके, किरण शेठ घाणेकर, अतुल बडे, गणेश नाचणकर, राहूल पेडणेकर, मिलिंद वायंगणकर , प्रविण पाटील, जेष्ठ कॅरम खेळाडू श्री. सुधीर मांडवकर, श्री. अभिजीत बेर्डे, श्री. दिनेश पारकर, महेश कांदळगांवकर , ह्या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.
