
कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते अयोध्या नविन ट्रेन सुरू करावी- सचिन वहाळकर
रत्नागिरी :बावीस जानेवारीला अयोध्येत राममंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत असून त्या अगोदर पासून देशभरातून रामभक्त अयोध्येला भेट देत आहेत.बावीस तारखेनंतर यात मोठी वाढ होणार असून जगभरातील श्रद्धाळू अयोध्येला भेट देणार आहेत. अयोध्या जगातील एक मोठ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होतय. दरवर्षी देशभरातून हजारो रामभक्त अयोध्येला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्येत जाणारी कोणतीही ट्रेन नसल्याने प्रवासीवर्गाला मुंबई अथवा इतर मार्गावरुन जावे लागत आहे. तरी कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते अयोध्या नविन ट्रेन सुरू करण्यात यावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्या सह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कडे केली आहे. हि गाडी विकली बेसीस वर सुरू करावी अशी मागणी केली असून याचा पाठपुरावा आपण करणार असल्याची माहिती सचिन वहाळकर यांनी दिली.