
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) तर्फे कसबातील प्राचिन मंदिर परीसराची स्वच्छता
रत्नागिरी :छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे विद्यमान अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या हस्ते महाराजांना हार घालून वंदन करण्यात आले. नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हातील सर्व शिवशंभूपाईक एकत्र येवून कसबा संगमेश्वर येथील प्राचिन मंदिर परीसराची स्वच्छता करण्यात आली.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) यांच्या शिलेदारांकडून जिल्हातील विविध किल्ले संवर्धन, संरक्षण तसेच किल्यांवर स्वच्छता अभियान राबवणे असे उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात त्याचप्रमाणे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि.) माध्यामातून दवाखाने, विविध धार्मिक स्थळे व समाजोपयोगी उपक्रम असणा-या ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात येतात. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध प्रकारची मार्गदर्शन शिबिरे देखील आयोजित केली जातात.
या स्वच्छता अभियान मध्ये प्राचिन मंदिराचा परिसरातील वाढलेली झाडी, गवत, माती, मंदिराच्या घुमटावर वाढलेले गवत असे काम केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि.) चे सर्व पदाधिकारी सचिव समिर गोताड, संघटक समिर धावडे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, मिडिया प्रमुख प्रथमेश पवार तसेच सदस्य संदेश धावडे, चंद्रकांत गोताड, प्रशांत कांबळे, निरज ठोंबरे, अनिकेत फुटक,सुदिप पवार, प्रतिक्षा शिवगण इ सहभाग होता.