
संजीवन गुरूकुलमध्ये स्वामी विवेकांनद व माता जिजाऊ यांना अभिवादन
रत्नागिरी,: – पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलमध्ये स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ जयंती मोठया थाटात साजरी करण्यात आला. कु. समर्थ वाखणकर यांनी स्वामी विवेकानंद तर कु. हर्षदा रोडे हिने माता जिजाऊ यांची वेशभूषा केली.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी व्यासपीठावर प्रबंधक मनोज जाधव, उपमुख्याध्यापक वसंत आर्डे तसेच अध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी मनोगतात कु. रिध्दी कांबळे, कु. वेदांत गोसावी, कु. आदित्य फल्ले तर शिक्षक मनोगतात ज्येष्ठ शिक्षक दिनेश मोहिते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज जाधव व उपमुख्या. वसंत आर्डे यांनी स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापिका वैभवी भावे तर आभार प्रज्ञा जाधव यांनी प्रकट केले.