
विद्यार्थ्यांचे साहस; 10 कि.मी.चा चढाव केला सर
गुरूवर्य जोग संजीवन गुरूकुलचा ‘ट्रेकिंग’ उपक्रम
रत्नागिरी:- पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रेकिंग’ उपक्रमाअंतर्गत आपली शारिरिक क्षमता आजमावताना टिकळेकरश्वरचा सुमारे 10 कि.मी.चा चढाव यशस्वीरित्या सर करत साहसी धाडस दाखविले.
गुरूकुलच्या या ट्रेकिंग उपक्रमामध्ये इ. 5 वी ते 9 वीचे एकूण 84 विद्यार्थी सहभागी झाले होते. दररोज होणारा व्यायाम, विविध प्रकारचे योगा, सुर्यनमस्कार यामुळे आरोग्यदृष्या सक्षम बनलेल्या गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी देवरूख येथील टिकळेश्वर येथील सुमारे 10 कि.मी.चा चढाव तसेच 10 किं.मी.चा उतार असे एकूण 20 कि.मी. चे अंतर न थकता अगदी सहजरित्या यशस्वीरित्या पार केले. विद्यार्थ्यासोबत प्रबंधक मनोज जाधव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
