
साखरपा येथील विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम संपन्न
महात्मा गांधी विद्यालय व बाबासाहेब कोलते जुनियर कॉलेजच्या मुलांनी विविध विभागात दाखविले कौशल्य
रत्नागिरी — रयत शिक्षण संस्थेद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय आणि बाबासाहेब कोलते जुनियर कॉलेजच्या विविध विभागांमध्ये कौशल्य दाखविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्नेहसंमेलना दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती आणि मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
दुर्गम भागात ज्ञानगंगा प्रसारित होऊन दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य प्रकाशमान व्हावे व स्वावलंबनाचा मार्ग विद्यार्थ्यांना सापडावा ह्या उदात्त हेतूने पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू केलेली आहे.
शाळे द्वारा आयोजित वनभोजन, क्रीडा स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता.
शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कला आणि इतर उपजत गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने शाळेकडून उपरोक्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव शालेय स्नेहसंमेलनात करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे अविनाश लाड आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुजावर मॅडम यांची उपस्थिती.
स्नेहसंमेलना दरम्यान शाळेमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री कल्लोळे सर.आणि त्यांच्या अधिनस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
