
उबाठा शिवसेना उपशाखा प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः अस्वस्थ वाटू लागलेल्या वृद्ध उबाठा शिवसेना उपशाखा प्रमुखाला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. महेश मोहन पत्की (वय ६०, रा. शंखेश्वर पार्क, जिल्हा परिषद जवळ, रत्नागिरी) असे मृत उबाठा शिवसेना उपशाखा प्रमुखाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) दहाच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश यांना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. तात्काळ त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.