
एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार येथे महाप्रसादाचे आयोजन
रत्नागिरी: नृसिंह जयंती उत्सवानिमित्त श्री दत्तसेवा मंडळ घुडेवठार, पाटिलवाडी, विलणकरवाडी, चवंडेवठार यांच्याकडून भाविकांसाठी शनिवार १३ जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी दत्तसेवा मंडळ एकमुखी दत्त मंदिर येथे नृसिंह जयंती उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. तरी भाविकांनी शनिवार दि. १३ जानेवारी रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तसेवा मंडळ घुडेवठार, पाटिलवाडी, विलणकरवाडी, चवंडेवठार यांचेकडून करण्यात आले आहे. ज्यांना शिधा, वस्तू, देणगी द्यायची असेल त्यंनी एकमुखी दत्त मंदिर येथे जमा करुन पावती घ्यावी असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.