
वैभव मेस्त्री ‘रत्नागिरी श्री’ 2024 चा विजेता
चिपळूण: टीडब्ल्यूजे, वेलनेस क्लब पुरस्कृत व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशनची जिल्हा अजिंक्यपदाची शरीर सौष्ठव स्पर्धा चिपळूण येथे उत्साहात पार पडली. याकरता जिल्ह्यातील 112 शरीर सौष्ठवपटूंनी भाग घेतला होता.
मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘ रत्नागिरी श्री 2024’ या शरीर सौष्ठव स्पर्धेत फिनिक्स फिटनेस व हार्डकोअर जिम रत्नागिरी येथील वैभव मेस्त्री याने आपल्या उत्कृष्ट पोझिंग व पिळदार स्नायूंच्या जोरावर सर्व स्पर्धकांवर मात करून ‘ रत्नागिरी श्री 2024’ हा मानाचा खिताब मिळवला. याच स्पर्धेत शुभम लांजेकर हा गट विजेता झाला. तसेच रत्नागिरी कुमार 2024 मध्ये ओमकार किर गट विजेता झालं. रत्नागिरी उदय 2024 या स्पर्धेमध्ये सौरभ भोंगले हा ही गट विजेता झाला. रत्नागिरी मेन्स फिटनेसमध्ये यश चव्हाण याने उत्तम कामगिरी केली.
या सर्वांनी मानाचे पुरस्कार मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. रत्नागिरी श्री 2024 ठरलेला वैभव मेस्त्री हा गोळप येथील रहिवासी असून नियमितपणे व्यायामाप्रती एकनिष्ठ राहून सराव करत असतो. जिममधील या सर्वच स्पर्धकांना उत्कृष्ट यश मिळाल्यामुळे फिनिक्स जिम व रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींच्यावतीने त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.