
गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी :कोंड असुर्डे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र तुकाराम सावंत (वय ६०, रा. कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर,
जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. ८) साडेतीनच्या सुमारास घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र सावंत यांनी सोमवारी कोणत्यातरी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केले.
तात्काळ उपचारासाठी त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.