
मुकुल माधव विद्यालयात स्वामी स्वरूपानंद यांची जयंती मोठ्या थाटात साजरी
रत्नागिरी :दिनांक ८/१/२०२४ सोमवार रोजी मुकुल माधव विद्यालयात स्वामी स्वरूपानंद यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली , याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वामी स्वरूपानंद याच्या जयंती निमित्त दिंडी काढण्यात आली, यात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे दिसून आले . लेझीम , ढोल ताशाच्या गजरात स्वामींची पालखी काढण्यात आली . पालखी नाचवत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भजने गाईली . लेझीम ढोल टाळ यांच्या तालात स्वामींची पालखी प्रशालेच्या सभागृहात आणली तेथे सामुहिक आरती घेण्यात आली . स्वामींच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मनोभावे पूजा करण्यात आली . विद्यार्थ्याना या प्रसंगी स्वामींच्या जीवनावर माहिती सांगण्यात आली . आभार प्रदर्शन झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .