
रत्नागिरीच्या ॲक्वा टेनिक्स स्विमिंग अकॅडमीच्या सोहम मंजुळेला घवघवीत यश
रत्नागिरी : दिनांक 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलाव मध्ये स्विमिंग हब आयोजित यशवंतराव चव्हाण दुसऱ्या राष्ट्रीय- राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ॲक्वा टेनिक्स स्विमिंग अकॅडमी रत्नागिरी मधून पाच जलतरणपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये सोहम देवेंद्र मंजुळे याने राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रजत, दोन कांस्य, व तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रजत, दोन कांस्य व रिले मध्ये एक कांस्य अशी एकूण 15 पदके मिळवली.
तसेच सानवी साळवी हिने राज्यस्तरीय स्पर्धेत एक कांस्य पदकाची कमाई केली आहे सदस्य स्पर्धेत महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून साधारणता 350 स्पर्धक सहभागी झाले होते.
ॲक्वा टेनिक्स स्विमिंग अकॅडमी रत्नागिरी चे प्रशिक्षक विवेक विलणकर व विजयी विद्यार्थ्यांचे श्री नित्यानंद भुते यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.