
मांडवीतील सुशील शिवलकर झाले सुपरक्लासवन अधिकारी
रत्नागिरी, : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी शहरातील मांडवी येथील प्रा. सुशील शिवलकर यांची नियुक्ती केली आहे. पदोन्नतीने त्यांना ही बढती मिळाली असून, आता ते सुपर क्लासवन अधिकारी बनले आहेत. सिंधुदुर्गमधील पदभारमुक्त होऊन आता त्यांनी रत्नागिरीत पदभार स्वीकारला आहे.
प्रा. सुशिल शिवलकर हे मराठी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्रात एमए झाले. त्यांनी एमएड, एमफिल, डीजे या पदव्या संपादन केल्या आहेत. रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रा. शिवलकर १९९२ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून रूजू झाले. २००६ मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अधिव्याख्याता या पदावर त्यांची नियुक्ती झाली. २०१३ मध्ये त्यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत क्लासवन अधिकारी पदी वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी प्राचार्य असताना शासकीय उपक्रमांसोबतच सहकाऱ्यांच्या मदतीने दहा अभिनव प्रकल्प हाती घेऊन यशस्वी केले. यामध्ये उर्दू विद्यार्थ्यांसाठी मोबाईल अॅप, दिव्यांग मुलांसाठी ‘स्माईल’, बालगृहातील मुलांसाठी ‘जीप’ असे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता.