
फोर्ब्स मिडल ईस्टच्या टॉप 100..C.E.O 2023 मध्ये डॉ. चिलवान 26 व्या स्थानी
रत्नागिरी :डॉ. अदनान अ.शकुर चिलवान यांचे उत्तुंग यश प्राप्त केले आहे. अदनान अ. शकुर चिलवान टॉप 100 C.E.O 2023 मध्ये 26 व्या स्थानावर आले आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या फोर्ब्स मिडल ईस्ट च्या टॉप 100 C.E.O 2023 मधील यादी मध्ये गुंबद सैतवडे, जिल्हा रत्नगिरी येथील स्वर्गवासी अ. शकुर इब्राहिम चिलवान यांचे सुपुत्र डॉ. अदनान अ. शकुर चिलवान यांचा टॉप 100 C.E.O 2023 मध्ये 26 व्या स्थानी समाविष्ट झाला आहे.
डॉ. अदनान अब्दुस शकुर चिलवान हे U.A.E येथिल दुबई इस्लामिक बँक मध्ये C.E.O पदी कार्यरत आहेत. डॉ. अदनान अ. शकुर चिलवान यांचे मुळ गाव हा सैतवडे, गुंबद मोहल्ला, ता. जि. रत्नागिरी आहे. Forbes Middle East च्या Top 100 CEO 2023 मध्ये गुंबद- सैतवडे येथील डॉ. अदनान चिलवान यांचा समावेश झाल्याने देशभरासह कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली कित्येक वर्षे डॉ. अदनान चिलवान यांनी फोर्ब्स मिडल ईस्ट च्या टॉप 100 सी. ई.ओ. मधील आपले स्थान कायम ठेवले आहे.. त्यांचे वडील अ. शकुर इब्राहिम चिलवान यांचे काही महिन्याअगोदर निधन झाले होते. डॉ. अदनान चिलवान यांचे हे यश म्हणजे स्वर्गीय पिताजींना एक प्रकारची श्रद्धांजली आहे.