
श्री स्वामी स्वरूपानंद चरणी सेवा कॅम्प
रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन, पावस विभाग मेकॅनिक ग्रुप तर्फे मोफत ब्रेक डाऊन कॅम्प.
रत्नागिरी:- पावस येथील श्री. स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव १२१ वी जयंती ( तिथीप्रमाणे) निमित्त पावसविभाग मेकॅनिक ग्रुप च्या वतीने भाविकांच्या सेवेकरिता विनामूल्य मोफत दुचाकी टू-व्हिलर ब्रेक डाऊन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
कॅम्प चे उद्घाटन दत्तप्रसादिक मंडळ घुडेवठार चे सर्व पदाधिकारी व आमचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते फिक्स नगरसेवक श्री.अमित विलणकर यांच्या समवेत , प्रतियश उद्योजक श्री.साईनाथ नागवेकर शेठ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
पावस विभागाचे पोलीस श्री.महेश कुबडे साहेब तसेच श्री. अवधूत सुर्वे साहेब, यांनी सदिच्छा भेट दिली.
कॅम्प करिता व्हाल्वोलाइन ऑईल अधिकृत जिल्हा वितरक प्रणव ऑईल डीस्ट्रीब्युटर
चे विशेष सहकार्य लाभले.सेल्स आॅफिसर श्री. सुनिल जाधव हे उपस्थित होते. तसेच आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व भावी नाही फिक्स नगरसेवक श्री. सौरभ शेठ मलुष्टे यांचे पण विशेष सहकार्य लाभले.
पावस मेकॅनिक विभागाचे अध्यक्ष श्री. महेश पालकर, अल्लाउद्दीन पटवरी, कल्पेश मेस्त्री, सचिन भाटकर, संदेश आग्रे, सुनाद जाधव, महेश आलम, तसेच रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन चे धनंजय कदम, गणेश शेंडे, दिलीप शिंदे, प्रदिप रेवाळे, जितेंद्र भुते, हे उपस्थित होते. पावसचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिशेठ डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
