
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जिल्हा शाखा स्थापन
रत्नागिरी:-मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक आणि राज्य सचिव साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी हिदायत नाईक, जिल्हा उपाध्यक्षा नाझिया दुंडगे, जिल्हा सचिव मुनाफ गुहागरकर, जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम सोलकर, जिल्हा कोषाध्यक्ष शौकत कारविणकर तसेच राज्य उपाध्यक्ष पदी जियाऊल्लाह खान आणि शिक्षक नेते म्हणून अ. रहमान कुरेशी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील ही तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदाची माळ अन्वर कुरवले यांच्या गळ्यात घालण्यात आली. तालुका सचिव पदी फय्याज सुर्वे, कार्याध्यक्ष बशीर अलवारे. कोषाध्यक्ष अ. समद पटेल यांना घोषित करण्यात आले. यावेळी नवीन उर्दू शिक्षक संघटनेची निर्मिती साठी जिल्ह्यातील बहूसंख्य शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमा साठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण प्राचार्य शिवलकर, सावंत मॅडम (उर्दू विभाग), रत्नागिरी उप. शिक्षणाधिकारी कडव, कोल्हापूर शिक्षणाधिकारी आंबोकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल पाटील, रायगड जिल्ह्यातील अखिल भारतीय शिक्षक संघाचे पदाधिकारी, सिराज खान, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालकांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आले. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारुन संघटना एकजुटीने कार्य करेल अशी ग्वाही दिली.