
कोकण रेल्वेचा १२ ला मेगाब्लॉक
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डा – रत्नागिरी विभागातील मालमत्ता देखभालीसाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी ७ ते ९.३० दरम्यान हा मेगाब्लॉक राहील.
यामुळे काही गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. या मार्गावरील गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम ते निजामुद्दीन या मंगला एक्स्प्रेसचा ११ जानेवारी रोजीचा प्रवास मडगाव जंक्शन दरम्यान १.४५ तासांसाठी नियमित केला जाईल. तसेच रत्नागिरी विभागात गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्स्प्रेसचा ११ जानेवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव जंक्शन दरम्यान १.१० तासांसाठी नियमित केला जाईल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी केले आहे.