
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न पूर्ण
रत्नागिरी : धावनगरी रत्नागिरीचे स्वप्न रविवारी सत्यात उतरले. सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी सकाळी झुंबा डान्सने वॉर्म अपला सुरवात झाली. गुलाबी थंडी, नदी, दऱ्या, झाडी आणि खाडीकिनाऱ्यावरून निसर्गरम्य वातावरणात निघालेली कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी तब्बल १५०० स्पर्धकांनी ५, १० आणि २१ किलोमीटरचे अंतर कापले. मार्गावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावदुतांचे आगळेवेगळे जल्लोषात स्वागत केले. २१ किमीचे अंतर फक्त १ तास १० मिनीटांत कापून याने विवेक मोरे याने हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील वर्षीची मॅरेथॉन ५ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे या वेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी या वेळी जाहीर केले. रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून थिबा पॅलेसजवळ झुंबा डान्स व वॉर्म अप सुरू झाला. त्यानंतर मथुरा हॉटेल येथून ६ वाजता शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू ऐश्वर्या सावंत, संपदा धोपटकर आणि वीरमाता श्रीमती ज्योती राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ किमी स्पर्धेचे उद्घाटन झाले.
हॉटेल मथुरा येथून २१ किलोमीटरसाठी धावपटू प्रचंड वेगाने धावू लागले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप या मार्गावरून येताना कधी सपाटी, चढाव, उतार यावरून पुढे निघाले. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायतींनी हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली. १० किमीसाठी ६.१५ वाजता झेंडा दाखवला व नाचणे, शांतीनगर व वळसा मारून त्याच मार्गाने मारुती मंदिर मार्गे भाट्ये येथे पोहोचले. तर ५ किमीची स्पर्धा ६.५० वाजता सुरू झाली व मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत आली. भाट्ये येथे समुद्रकिनाऱ्यावर सांगता समारंभ झाला. यावेळी स्पर्धकांच्या तोंडून वॉव, अप्रतिम, वंडरफूल असे उत्स्फूर्त शब्द ऐकायला मिळाले. १० किमी- १६ ते ३५ वयोगट- पुरुष- अमेय धुळप, अभिनय घुरे, आदित्य धुळप, तुषार लोंढे. महिला- हेमांगी देसाई, कामिनी कार्लेकर, युगंधरा मांडवकर, रेणुका कांबळे. ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- चैतन्य उप्पीन, साजिद शेख, धनंजय रुपनर. महिला- मनस्वी गुडेकर, सोनाली खानविलकर, संपदा खातू. ४६ ते ५५ वयोगट- पुरुष- सुहास आंब्रेले, संतोष महाकाळ, प्रशांत दाभोळकर, केवल बारगोडे. महिला निशिगंधा नवरे, सायली निकम, धनश्री जोशी. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- प्रवीण कुलकर्णी, काशिनाथ पाटील, नवीन जोशी. महिला- अनिता पारेख, विद्या चव्हाण, शिल्पा बन्साली, ६५ वर्षांवरील गट- पुरुष- सतिश दीपनिक, चंद्रकांत धुरी, जयंत माजिरे. महिला- दक्षा कन्विय
५ किमी- १६ ते ३५ वयोगट- यश शिर्के, श्रेय मांडवकर, संदेश सोरटे. महिला- शिवानी मासये, साक्षी पांचाळ, दीपाली भोजे. ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- रणजित पवार, सचिन चौगुले, राजकमल उपाध्याय. महिला- नीलम ओसवाल, शुभांगी तहसीलदार, रिता संत्रा. ४६ ते ५५ वयोगट- पुरुष- बरून संत्रा, योगेश गंगावणे, विश्वास जाधव. महिला- मानसी मराठे, सत्या यादव, रश्मी सावंत. ५६ ते ६५ वयोगट- पुरुष- नारायण पाटाळे, प्रतापसिंग शिर्के, पूर्णसिंग मेहरा. महिला- वीणा गोगटे, सुनीता फुटाणे, सुषमा राणे. ६५ वर्षांवरील वयोगट- पुरुष- गजानन भातडे, अशोक काटकर, अविनाश भाटकर. महिला- प्रतिभा मराठे, शुभांगी देवरुखकर, सविता काटकर.