
क्रांतीनगर झोपडपट्टी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई २७५ रुपयांची पाच लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. संशयित महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास क्रांतीनगर-झोपडपट्टी येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला क्रांतीनगर झोपडपट्टी कब्रस्तानच्या समोर विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत होती. पोलिसांनी कारवाई केली असता तिच्याकडे २७५ रुपयांची पाच लिटर दारु सापडली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.