
शिवरेवाडी येथील वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी : शहराजवळील शिरगांव-शिवरेवाडी येथील वृद्धाने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. शैलेश चंद्रकांत निवळकर (वय ४४, रा. शिरगाव- शिवरेवाडी, सुतारवाडी, ता. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी नऊच्या सुमारास सुतारवाडी येथे निदर्शनास आली. शैलेश हे बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरातील बेडरुमध्ये झोपले होते. सकाळी ते उठले नाही म्हणून पाहायला गेले असता त्यांनी बेडरुममधील सिलींग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.