
यंदाच्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याचे निवे येथे आयोजन
१९ ते २३ कालावधीत वननिवास उपक्रमासह रंगणार शारीरिक प्रात्यक्षिके , शोभायात्रा ,शेकोटी , रांगोळी , चित्रकला सह तंबू सजावटीची स्पर्धां
रत्नागिरी :रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा माध्यमिक आश्रम शाळा निवे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आला आहे . .19 ते 21 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या मेळाव्यामध्ये जिल्हाभरातील अनेक शाळांमधील स्काऊट्स आणि गाईड्स सहभागी होणार आहेत .
मेळाव्यामध्ये संचलन , कलर पार्टी ,रांगोळी स्पर्धा (गाईड ) चित्रकला स्पर्धा ( स्काऊट आणि गाईड )शारीरिक प्रात्यक्षिके , शोभायात्रा ,तंबू सजावट स्पर्धे सह शेकोटी कार्यक्रम इत्यादी उपक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेणे अनिवार्य असल्याचे रत्नागिरी जिल्हा कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे . संचलन स्पर्धेत स्काऊट आणि गाईड मिळून कमाल 20 जणांचा एक संघ सहभागी करता येईल .कलर पार्टीमध्ये पाच जणांची कलर पार्टी असणार आहे .
शारीरिक प्रात्यक्षिक मध्ये सर्व स्काऊट गाईडचा एकत्रित सहभाग असणार आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण सादरीकरण ,एक वाक्यता , कौशल्य , नेतृत्व संघभावना याप्रमाणे निकष असणार आहेत .
शोभा यात्रेमध्ये सांस्कृतिक उत्सव , सणवार , स्त्री भृणहत्या , अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर पेहराव असावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे .त्याचप्रमाणे तंबू सजावट स्पर्धेमध्ये केवळ स्काऊट सहभागी होणार असून यामध्ये तंबू परिसर स्वच्छता ,कचरा व्यवस्थापन , गॅजेट्स ची संख्या , प्रवेश गेट बांधण्या व दोरीच्या गाठींचा उपयोग अचूकता इत्यादी निकष राहणार आहेत . तसेच शेकोटी कार्यक्रमांतर्गत दिनांक 19 रोजी गाईड विभागासाठी लोकनृत्य हा विषय देण्यात आला असून स्काऊटसाठी देशभक्तीपर नृत्य थीम देण्यात आली आहे . पाच मिनिटांच्या कालावधीत सादरीकरण साठी देण्यात येणार आहे गाईड विभागासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक संघातून दोन गाईड्स ना यामध्ये सहभाग घेता येणार आहे .रांगोळी साठी लागणारे साहित्य व रांगोळी स्वतःच आणावयाची आहे .यासाठी 60 मिनिटांचा वेळ असून पर्यावरण , सामाजिक समस्या या विषयावर रांगोळी काढावी लागणार आहे . चित्रकला स्पर्धा देखील या मेळाव्यामध्ये होणार असून यामध्ये प्रत्येक शाळेच्या संघातून दोन स्काऊट आणि दोन गाईड यांना सहभागी होता येणार आहे चित्र काढण्यासाठी लागणारा कागद जिल्हा संस्थेकडून देण्यात येणार असला तरी चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्य हे स्पर्धकांनी स्वतः आणायचे असल्याचे सांगण्यात येत आहे यासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून पाणी वाचवा ,स्वच्छता अभियान , अवयव दान ,अशा महत्त्वपूर्ण विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहे .यामध्ये विजेत्या शाळांना ट्रॉफी व संघातील सहभागी स्काऊट गाईड यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
