
जयगड येथील तौसीफ पांजरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
खंडाळा – रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील सर्व सामान्य कुटुंबातील व संच्या शिवसैनिक सर्व सामान्य लोकांचा लाडका तोसिफ पांजरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे.उद्योजक आण्णा सांमत,राज्याचे उद्योग मंत्री तालुक्याचे आमदार रायगड रत्नागिरी चे पालक मंत्री उयजी सांमत ,भैयाशेठ सांमत , विभाग प्रमुख बाबय कल्याणकर ,उपविभाग प्रमुख अजीम भाई चिकटे यांचे विशेष प्रयत्नाने तोसिफ पांजरी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झाली .विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झाल्यावर तोसिफ पांजरी असे म्हणाले की, हि माझ्या कामाची पोच पावती आहे .आण्णा साहेब ,आमदार साहेब भैयासाहेब यांनी माझ्या वर विश्वास दाखविले आहे त्याचे मी जयगड गावातील व वाटद जिल्हा परिषद गटातील लोकांची कामे करीन या पदामुळे जयगड गावातील गैरसोय दूर झाली आहे विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झाल्याचे पञ भैयाशेठ सांमत यांच्या हस्ते देण्यात आले.यामुळे तोसिफ पांजरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे