
कंटेनरला ठोकणाऱ्या डंपर चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या धामणी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडक देणाऱ्या डंपर चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंमद अजमुद्दीन अन्सारी असे डंपर चालकाचे नाव आहे महम्मद अन्सारी हा खडी भरून जात होता मात्र भरधाव वेगाने जात असताना पुढून येणाऱ्या कंटेनरवर जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडल्याचे पोलीस तपासात समजत आहे तसेच महम्मद अन्सारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू आहे.
काम करत असताना योग्य खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे असे असताना डंपर अथवा अनेक वाहने भरधाव वेगाने अथवा नियमांची पायमल्ली करताना दिसत असून अपघात घडत असल्याचे संगमेश्वर तालुक्यात चित्र आहे . याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे