
भरणेत दुचाकी धडकेत पादचारी जखमी
खेड : भरणे मार्गावरील मंगळवार आठवडा बाजारनजीक दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला धडक दिली. त्यात तो जखमी झाला. स्वाराने त्याला जखमी अवस्थेत टाकून घटनास्थळावरून पलायन केले. उमेश विष्णू मेटकर असे त्या जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ ला रात्री सव्वा नऊच्या सुमारास मेटकर खेड-भरणे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत जात होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचारी मटकर यांना धडक दिली. त्यांना जखमी अवस्थेत ठेवून स्वाराने पलायन केले. या प्रकरणी मेटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.