
रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघाच्या गाव कमिटी सभांना उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी:तालुक्यातील
९८ गावांपैकी ५० गावांमध्ये भंडारी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे. काही गावे तर पुर्ण भंडारी वस्तीची आहेत.मंगळवारी भंडारपुळे मालगुंड गावांमध्ये बैठका पार पडल्या. भंडारपुळे मध्ये मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. आमच्या गावाच्या नावातच भंडारी असल्याने आम्हांला गावासहीत आमच्या जातीचा नितांत अभिमान आहे. भंडारी समाजसंघ करत असलेल्या कार्यात आमच्या कायम पाठिंबा असेल अशी ग्वाही गावकमिटी अध्यक्ष उदय पाटील यां नी दिली. ४ महिन्यापुर्वी भंडारी समाजसंघाची निवडणुक होवुन भागोजीशेठ कीर पॅनलचे सर्व उमेदवार निवडुन आले. गेल्या ३-४ वर्षात ठप्प झालेले समाजसंघाचे कार्य आजी माजी पदाधिकारी एकत्र येत गावकमिटी सशक्तीकरण, कॅलेंडर वाटप, गोरगरीब कमी शिकलेल्या मुलिंची मोफत वधुवर सूचक नोंदणी, आजीव सभासद वाढ आणि भंडारी पदवीधर नोंदणी करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बैठकांचे नियोजन केले आहे. संपुर्ण मानवजातीचे खरेखुरे मायबाप श्रीमान भागोजीशेठ कीर याच्या २४ फेबृवारीला होणाऱ्या रॅली व पतितपावन मंदीरात होणाऱ्या सहभोजन कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी भंडारी समाज एकवटला आहे.
दि.८ डिसेंबर २३ पासून आपण पुढील प्रमाणे ४४ भंडारी गावामध्ये बैठाका घेवुन भंडारी दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. आहे.गणेशगुळे,मावळंगे, नातुडे, गावडे आंबेरे, डोर्ले, कुर्ली, रनपार, दभिळ वाडी, कोळंबे, मागलाड, भाट्ये,काळबादेवी,नेवरे, वरवडे, पोमेंडी, चिंचखरी,सोमेश्वर,कोतवडे,सडये,आरे,वारे ,कचरे, गावखडी,पूर्णगड, पावस,नाखरे, रीळ, ढोकमळे,वा्यंगणी,संदखोल,अंबुवाडी, नांदिवडे, चाफेरी, कासारी, जयगड,शिरगाव,मालगुंड , भंडारपुळे या गावांमध्ये आणि शहरातील बहुतांश भागामध्ये बैठका पुर्ण होवुन दिनदर्शिकेचे वाटप पुर्ण झाले आहे.भंडारी गावांमधील बैठकांचे नियोजन करण्यासाठी भंडारी समाज संघाचे आजी माजी पदाधिकारी आणि गावकमिटीचे सदस्य मेहनत घेतली.
या वेळी विवेक सुर्वे, नाना खाडे, विजयबुवा मयेकर, शरद शेट्ये, अजय शेट्ये , अमित भाटकर,सुहास हातिसकर , पराग भाटकर , सचिन मयेकर , उदय पाटील , अमृत पोकडे , दशरथ रांगणकर , श्रीकृष्ण बिर्जे , संदेश तोडणकर , मनिष तिवरेकर , अनिकेत नागवेकर , देवेंद्र भाटकर , अमित गडदे यांच्यासहीत अनेक भंडारी बंधु भगिनीनीं मदत केली.