
पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप;पंपाबाहेर वाहनचालकांचे लांबच लांब रांगा
रत्नागिरी :राज्यभर अचानकपणे टँकर चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संपामुळे पेट्रोल डिझेलचा दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. कार्यालयीन कर्मचारी नेमका त्याच वेळेत कामकाजात व्यस्त असल्याने सायंकाळी पंपापासून बाहेर लांबच लांब लागलेल्या रांगांमध्ये त्याला पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र दिसत होते. रात्री उशिरापर्यंत संप मागे घेण्याबाबत कोणतेही वृत्त हाती आलेले नाही.
दरम्यान, रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर ते आज दुपारनंतर पेट्रोल भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगा दिसू लागल्या. या लाईन लागण्याचे कारण एकच होते पेट्रोल टँकर घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरने संप केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली पेट्रोल टँकरचा संप आहे ही बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून समजताच रत्नागिरी शहरासह जिल्हाभरात सर्व पंपावर गर्दीची एकच लाट आलेली दिसत होती. थर्टीफस्ट उशिरापर्यंत साजरा करणाऱ्यांसाठी तर भरदुपारी झोपेतून उठल्यानंतरचा हा मोठा धक्का होता. पंपाबाहेर रांगांमध्ये दुचाकी मोठ्या प्रमाणात दिसत होत्या तसेच चार चाकी वाहनेही पेट्रोल पंपावरती दिसून येत होती. यामध्ये जास्त महिलावर्ग आपली दुचाकी घेऊन ज्या ठिकाणी गर्दी कमी दिसत होती त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसत आहेत. संध्याकाळच्या वेळेला कर्मचारी वर्ग कार्यालयातून सुटल्यानंतर सर्वात प्रथम आपापल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पंपांवर ते गर्दी दिसत आहे. एकूणच पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असाच सुरू राहिल्यास दैनंदिन वाहतूक व कामकाजावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

