
छत्तीसगड येथील मद्यपी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे येथे छत्तीसगड येथील मद्यपी तरुण-खलाशी फिरत असताना ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांच्या ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन उचारासाठी जिल्हा त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. परमेश्वर भागवतसिंग कंवर (वय २९, रा. जुनापारा, जिल्हा कोरबा, राज्य छत्तीसगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास मिरजोळे येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मद्यपी परमेश्वर हा नाटे येथे खलाशी म्हणून कामाला आला होता. मिरजोळे येथे भरकटलेल्या अवस्थेत व मानसिक रुग्ण असल्याचे मिरजोळे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला व त्याला शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लवलेकर यांनी त्याला उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. मात्र उपचार दरम्यान शनिवारी (ता. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश खापरे करत होते. तपासात त्यांना परमेश्वर यांच्या नातेवाईकांचा शोध लागला असून पोलिसांनी संपर्क केला आहे. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.