रत्नागिरी ः छातीत दुखून उलटी होऊन बेशुद्ध झालेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. संतोष पांडुरंग तारवे (वय ४४, रा. तारवेवाडी- हातखंबा, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष तारवे यांनी सायंकाळी चारच्या सुमारास छातीत दुखू लागले, त्यांना उलटी झाली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.