
भेळपुरी सेंटर फोडून ४ हजार रुपये लंपास
गुहागर:- तालुक्यातील गुहागर येथील भेळपुरी सेंटर फोडून अज्ञाताने रोख ४ हजार रुपये लांबवले. ही घटना बुधवार, २७ डिसेंबर रोजी रात्री ९ ते गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत रवींद्र वसंत रहाटे (वय ४२, रा. गुहागर, रत्नागिरी) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रवींद्र रहाटे यांचे गुहागर तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील मैदानाच्या समुद्र बीच लगत असणारे श्री समर्थ भेळपूरी सेंटरची ताडपत्री काढली. त्यानंतर स्टॉलमध्ये प्रवेश करत कांउटरचे दोन्ही ड्रॉव्हर उचकटून त्यात ठेवलेली रोख ४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.