
संजीवन गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रमांव्दारे कलाविष्कार
रत्नागिरी, – पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्य्रक्रमांनी उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून झाली. प्रबधंक मनोज जाधव यांनी व्यासपीेठावर उपस्थित मान्यवर प्रशालेचे मुख्या. राजेंद्र कांबळे, संस्था सदस्य विनायक हातखंबकर, विजय वाघमारे, पर्यवेक्षक नितीन मोहिते, सदस्य श्री. कुष्टे, ज्येष्ठ अध्यापिका सौ. मनाली नाईक, पालक प्रतिनिधी श्री. कांबळे, सौ. गोडगीळ, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे यांचे पुष्प देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक जाधव सर यांनी केले. इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे परिक्षण श्रीम. ऋतुजा वझे व ऋतुजा गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापक दिनेश मोहिते तसेच गुणदर्शन कार्यक्रमाचे निवेदन विद्याराणी घडशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकांचे सहकार्य लाभले.
