
काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनाचे औचित्य साधून काँग्रेसने केली पाणी चळवळ सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये व शहरा शेजारील ग्रामीण भागामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच पाण्याचे दुर्भिक्ष चालू झाले आहे. काँग्रेस च्या वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून काँग्रेस भवन येथे मा. महिला जिल्हाध्यक्षा व कोंकण विभाग विधी अध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी लोकसहभागातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करायचे असे ठरवण्यात आले. तसेच सविंधनाचे वाचन करून काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, कर्ला ग्रामपंचायत, शहर पोलिस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय यांच्याकडे भेट देऊन शहर व ग्रामीण भागामध्ये असलेली सार्वजनिक तळी व वीहरी साफ करून पाणी पिण्याचे योग्यतेच करावे असे निवेदन देण्यात आले. पाणी चळवळ ची काँग्रेस तर्फे प्राथमिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली. तदप्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, तालुका सरचिटणीस काका तोडणकर,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.