
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळ्यात चोख बंदोबस्त
रत्नागिरी :स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणपतीपुळे त वर्षअखेर व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. या काळात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयगड पोलीस ठाण्यामार्फत चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
येथील आपटा तिठा हे तीर्थक्षेत्राचे मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे या ठिकाणी बाहेरगावातून येणाऱ्या चारचाकी कार, दुचाकी तसेच इतर छोटी मोठी वाहनांची कसून चौकशी व तपासणी करण्यात येत आहेत
तसेच आपटा तिठा बरोबरच कोल्हटकर तिठा, सुर्वे स्टॉप, बस स्थानक, मोरया चौक आदीसह समुद्र चौपाटी आदी ठिकाणी पोलीस होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. तसेच थर्टी फस्ट ला होणारी गर्दी लक्षात घेता समुद्र चौपाटीवर ग्रामपंचायत गणपतीपुळे चे जीव रक्षक, संस्थांचे सुरक्षारक्षक आधीसह पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. या कामी येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी रत्नागिरी मुख्यालय व वाहतूक पोलीस बोलवण्यात येणार आहेत.
होणाऱ्या गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
सागरी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती क्रांती पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पोलीस जयेश किर, यांच्या सह रत्नागिरी होमगार्ड रत्नागिरी येथून आलेले पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी आदी मोठी मेहनत घेत आहेत.