
नाव़ड़ी येथे गोवा बनावटीची दारु जप्त
रत्नागिरी ः नावडी (ता. संगमेश्वर) येथे गोवा बनावटीच्या २ हजार ३८० रुपयांच्या १३ दारुच्या बाटल्या विक्रीसाठी बाळगल्या.
संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद प्रकाश विचारे (वय ३२, रा. संगमेश्वर) असे
संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी सव्वाच्या सुमारास नावडी-संगमेश्वर येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत संशयिताकडे गोवा बनावटीच्या २ हजार ३८० रुपयांच्या १३
बाटल्या सापडल्या. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल विवेक रसाळ यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन
पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.