
उक्षी येथे पादचारी लहान मुलाला दुचाकीची धडक
रत्नागिरी ः दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी मुलाला ठोकर देणाऱ्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर गोविंद पवार (वय ५४, रा. कापडगाव, शिंदेवाडी, रत्नागिरी) असे संशयित
स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) उक्षी येथील रस्त्यावर अनिल सावंत यांच्या दुकानासमोर घडली. पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार संशयित पवार हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एएफ ०८७२) यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवत असताना
संकेत नरेश थापा (वय ४ सध्या रा. उक्षी, रत्नागिरी) हे रस्ता ओलांडत असताना ठोकर दिली यामध्ये संकेत याच्या डोक्यास,
हाताला व डोळ्यास दुखापत झाली. या प्रकरणी अरुण देसाई (वय ५२, रा. उक्षी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार
दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.