
कोतवडेतील दिलीप रामाणे खुनाचा नऊ महिन्यांनी उलगडा
काजूच्या बिया चोरत असल्याच्या रागातून खून
रत्नागिरी :तालुक्यातील कोतवडे येथील दिलीप रामाणे याच्या खूनाची 9 महिन्यानंतर उकल करण्यात अखेर ग्रामीण पोलिसांना यश आल़े दिलीप हा दारूसाठी काजूच्या बिया चोरत असल्याने या रागातून खून करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या पाथमिक तपासात समोर आले आह़े त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून बुधवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी
नानू भोसले (40, ऱा कोतवडे रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आह़े त्यानेच दिलीप रामाणे याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय पोलिसांना आह़े अद्याप पोलिसांकडून खूनाचा पाथमिक तपास करण्यात आला आह़े अधिक तपास करावयाचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े आरोपीची न्यायालयाने 1 दिवसाची कोठडी दिल्याने कसून तपास करण्यात येईल़ असे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप रामचंद्र रामाणे (58, ऱा कोतवडे लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आह़े दिलीप यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीतील मृतदेह 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोतवडे पुंभारवाडी परिसरात आढळून आल्यानंतर कोतवडे गावात खळबळ उडाली होत़ी दिलीप याचा खून नेमका कुणी केला याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होत़े दिलीप याचा कुणाशी वाद नसल्याने या खूनाची काही केल्या उकल होत नव्हत़ी
दिलीप याचा खून झाला त्यादिवशी कुभारवाडी येथून पालखी वाड्या वस्त्यांवर फिरत होत़ी 17 मार्च रोजी सायंकाळी दिलीप याचा मृतदेह आढळून आला त्याठिकाणाहून पालखी मार्गस्थ झाली होत़ी यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या पालखीसोबत होत़े त्यामुळे नेमका आरोपी शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत होत़े पोलिसांकडून सुमारे 100 हून अधिक जणांचा जबाब नोंदविण्यात आला होत़ा तसेच दिलीप ज्या fिठकाणी दारू पिण्यासाठी जात असे तेथील सर्वांची चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली होत़ी