
कै. रा. पु. जोग स्मृतीदिनविविध उपक्रमांनी साजरा
समिक्षा लिंगायत, वैभवी भावे ठरते आदर्श शिक्षक
रत्नागिरी, – पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व गुरूवर्य रा. पु. जोग संजीवन गुरूकुलचे संस्थापक कै. रामचंद्र पुरूषोत्तम जोग यांचा स्मृती दिन विविध उपक्रमांनी दि. १९ डिसें. रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजीत निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराने समिक्षा लिंगायत व वैभवी भावे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात कै. जोग सर व कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत गायले. व्यासपीठावर उपास्थित मान्यवर संस्था पदाधिकारी श्रीराम भावे, माजी मुख्याध्यापक श्री. करमरकर, उपमुख्याध्यापक वसंत आर्डे, पर्यवेक्षक नितिन मोहिते, प्राचार्य श्रीम. पाटील, ज्येष्ट अध्यापिका श्रीम. नाईक, माजी नगरसेवक बंटी कीर, संस्था सदस्य विनायक हातखंबकर, श्री. घवाळी, श्री. कदम यांचे गुरूकुलचे प्रबंधक मनोज जाधव यांनी पुष्प देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज जाधव यांनी तर सुत्रसंचालक अध्यापक दिनेश मोहिते यांनी केले. त्यानंतर निबंध स्पर्धेत बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बक्षिस वितरणाचे सुत्रसंचालक अध्यापिका ऋतुजा वझे यांनी केले. गुरूवर्य जोग सर स्मृतीदिनानिमित्त यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार समिक्षा लिंगायत व वैभवी भावे यांना प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गातून निवडण्यात आलेल्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारामध्ये कु. मिरा कामतेकर, कु. आश्लेषा काळे, कु. चैतन्य देवडिंग, कु. सुदर्शन पाटील, वेदांत आंबवलेकर तसेच इ. १० वीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कु. वेदश्री फडके यांना सन्मानित करण्यात आले. तसेच होतकरु विद्यार्थी म्हणून प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी निवडण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक श्री. मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मेहनत घेतली.